चंद्रपूर:- संचालनालय, लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती, मुंबई अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा ६ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत सैनिक शाळा, विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला आहे. विभागीय क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्याच्या दृष्टीने मुख्य लेखा वित्त अधिकारी अशोक मातकर, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, स्थानिक निधी लेखा सहा. संचालक अमित मेश्राम व कोषागार अधिकारी प्रफुल वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात विविध समिती गठीत करण्यात आले आहे.
क्रीडा स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्याच्या दृष्टीने दीपक जेऊरकर, संदीप जेऊरकर, राजरत्न बेले, जयदीप साधनकर, पंकज खनके, संदीप ठाकरे, संजय श्रीपाद व अजयसिंह राठोड हे अधिकारी व कर्मचारी कार्य करीत आहेत.
मागील दोन वर्ष कोरोना महामारीचे असल्याने सदर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नव्हते. दोन वर्षानंतर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी चंद्रपूर जिल्ह्याला मिळाली असल्याने लेखा व कोषागार विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत