पाच मोर मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ #chandrapur

Bhairav Diwase
0


बल्लारपूर:- बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या कारवा वनपरिक्षेत्रात वन कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना पाच मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे. मोरांच्या मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास आता वनविभाग करीत आहे.

जिल्ह्यात वन्यजीवांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. मागील महिन्यात वाघांचा मृत्यू झाला होता. याचा विसर अद्याप झालेला नसताना पाच मोर मृत्तावस्थेत आढळून आले आहेत. बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या कारवा जंगलात वन कर्मचारी गस्त करीत असताना कक्ष क्रमांक 500 मध्ये हे मोर मृतावस्थेत दिसून आलेत. मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

वन विभागाने मोर आढळून आलेल्या परिसराची पाहणी केली. लगतच्या जलाशयातील पाण्याचे नमुने घेतलेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मोरांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)