लांबोरी ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचा झेंडा #chandrapur #Jiwati


सरपंच पदी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे मोतीराम सिडाम विजयी


जिवती:- तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीने लांबोरी ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला,

लांबोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप - काँग्रेस - गोंडवाना गणतंत्र पार्टीचे स्वतंत्र पॅनल उभे होते त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सरपंच पदासहित सदस्यांनी ही बाजी मारली.

तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित होताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या जिवती येथील निवासस्थानी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते तथा माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेविका सतलूबाई जुमनाके, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख, नगरसेवक ममताजी जाधव, जमालुद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव मेश्राम, राज गोंडवाना गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत