भंडारा:- संत गाडगेबाबा महाराज यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय साहित्य व संस्कृती मंच भंडारा तथा फ्रीडम स्टोरीच्या वतीने मंगळवारी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान ऑनलाईन काव्य संम्मेलन घेण्यात आले.
संमेलनाध्यक्ष भारतीय साहित्य व सांस्कृतीक मंच चे उपाध्यक्ष विजय जायभाये होते. प्रमुख उपस्थिती मा.शुभांगी खोब्रागडे (मा. नगरसेविका) होते .
आयोजिका हर्षा भुरे यांनी "गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला" गाडगे महाराजांचे आवडते भजन सादर करून काव्यसंम्मेलनाला सुरुवात केले.तर सूत्रसंचालन अजय राऊत यांनी केले.
संत गाडगेबाबा यांच्या कार्याच्या गौरव करणाऱ्या एकापेक्षा एक रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये कवी लीलाधर दवंडे, मनिष अहिरे, प्रभाकर दुर्गे, कवयित्री अर्चना गरुड, संध्या लायस्कर, निलीमा लांबकाने, विद्या ठवकर, शरयू कुलकर्णी, प्राची परचुरे वैद्य, राधा खानझोडे,सुनिता मोरे यांनी सहभाग नोंदविला. कवी मिलिंद खोब्रागडे, दिलीप महाजन यांनी उपस्थिती दर्शवली.आयोजिका हर्षा भुरे जिल्हाध्यक्ष भंडारा, यांनी सर्वांचे आभार मानले.
ऑनलाईन काव्यसंमेलन व्यवस्थितपणे पार पडले.