विद्यार्थ्यांचा आनंदवन येथे शैक्षणिक दौरा #chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, समाजाप्रती आपला काही देणं लागत या उदेशाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत व्हावी यासाठी प्रेरणा प्रशासकीय सेवा, गडचांदूर महाविद्यालयातर्फे महाराष्ट्र भूषण समाजसेवक बाबा आमटे यांची कार्यभूमी असलेल्या आनंदवन वरोरा येथे विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक दौऱ्यातून बाबा आमटे यांचे अतुलनीय कार्य जाणून घेतले. तसेच कृष्ठरोगी बांधव ज्या पद्धतीने स्वयंपूर्ण जीवन जगत आहे, त्याबद्दल माहिती जाणून हा समाजबांधव आपल्यातीलच असून त्यांना हीन प्रकारची वागणूक न देता प्रत्येक मानव वर्गानी त्यांना आपले करावे अशी भावना विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रति व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी बाबा आमटे,साधना आमटे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सदर अभ्यास दौऱ्याला सुरवात केली.

विद्यार्थ्याने कृष्ठरोगी बांधवतर्फे राबविण्यात येणाऱ्या हातमाग, टाकाऊ पासून टिकाऊ, काष्ठ सुतार काम व खादी लघु उद्योगाला भेट देऊन त्यांचे कार्य जाणून घेतले. प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा.पंकज देरकर, प्रा. एजाज शेख, प्रा.मनीषा मरस्कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना आनंदवन येथील विविध उपक्रमाची माहिती दिली. या शैक्षणिक दौऱ्यात चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला व महाविद्यालायचं या उपक्रमविषयी आनंद व्यक्त केला.