अश्विनी व यशवंत सुवर्ण पदकाचे मानकरी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील कुंभार समाजातील अश्विनी मोरेश्वर ताटकंटीवार हिची महिला सेस्टोबॉल भारतीय संघात व यशवंत रामचंद्र ताटकंटीवार यांची पुरुष सेस्टोबॉल भारतीय संघात निवड झाली होती. त्या दोघांनीही आपल्या आपल्या टीममधून भारत देशाचे नेतृत्व करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीने चंद्रपूरकरांची मान उंचावली आहे.
थायलंड सेस्टोबॉल फेडरेशन 2022 तर्फे आंतरराष्ट्रीय सेस्टोबॉल स्पर्धा २ ते ५ डिसेंबर या कालावधीत थायलंड येथे पार पडली. या स्पर्धेसाठी अश्विनी ताटकंटीवार हिची महिला तर यशवंत ताटकंटीवार यांची पुरुष सेस्टोबॉल स्पर्धा भारतीय संघात निवड करण्यात आली होती. भारतविरुद्ध थायलंड संघासोबत अंतिम स्पर्धा पार पडला. या स्पर्धेत दोघांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला सुवर्ण पदक पटकावून दिले.
७ डिसेंबरला त्या दोघांचे चंद्रपुरात आगमन होताच सेस्टोबॉल असोसिएशनचे सचिव नरेंद्र चंदेल, निखिल पोटदुखे, चेतन इदगुरवार, सागर परचाके, तोहिद कुरेशी, सॅनी मोहुर्ले, संकेत अवताडे, शुभम भगत, सागर नागपुरवार यांनी अश्विनी व यशवंत या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.