पोंभुर्णाकरांचे पाण्यावाचून हाल #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
शहरात ६ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प


पोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरात गेल्या 5 ते 6 दिवसापासुन पाणी पुरवठा ठप्प असुन नागरिकांत नगर पंचयातच्या कारभारा विषय जनतेत रोष निर्माण झाला आहे. शहरात पाणी पुरवठा ठप्प कशामुळे आहे. ही साधी तोंडी सूचनाही नगर पंचायात देऊ शकत नाही.

पोंभुर्णा नगर पंचयातची स्थापना २०१५ ला झाली तेव्हा पासुन दोन पंचवार्षिक मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री व क्षेत्राचे आमदार, नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात भाजपाची एक हाती सत्ता आहे. पण अजून दैनिक गरजा वीज, पाणी, स्वछता हे नगर पंचायत नियमित देऊ शकत नाही आहे. जनतेकडुन नियमित कर वसुली केली जाते पण जन सुविधा देण्यात नगर पंचायत असमर्थ ठरत आहे.

मागिल पाच-सहा महिन्यापासुन पाणी पुरवठेत अनियमता आढळत आहे. दर पंधरा दिवसात मोटार बिघाडचा कारण समोर करित पाणी पुरवठा ठप्प ठेवत असल्याची ओरड सुरू आहे. नगरपंचयातचे पदाधिकरी या समस्येकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसत आहे.

आज सायंकाळी तर उद्या सकाळी,किवा दुपारी जेव्हा पुरवठा करणाऱ्याच्या मनात येईल अश्या वेळेत पाणी पुरवठा केला जातोय वेळापत्रक ठरलेला दिसत नाही यामुळे नागरिक हैराण झाले असल्याची तक्रार आहे.

पोंभुर्णा शहाराचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आजही कायम आहे. केवळ काही दिवसच पुरवठा केला जात असल्याची ओरड सुरू आहे. तरी देखील नगर प्रशासन,नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून या समस्येकडे दुर्लक्ष केला जात आहे.