पुस्तकांचे वाचन करून मुलांनी केले महामानवास अभिवादन #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेतील विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लगातार दोन तास पुस्तकांचे मूक वाचन करून अभिवादन केले.

वाचन संस्कृती विकसित व्हावी आणि बाबासाहेबांना समजायचे असेल तर वाचन केलेच पाहिजे म्हणून हा अनोखा उपक्रम शाळेत घेण्यात आला. इयत्ता पाच ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून मालार्पन करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच कांता ताई मडावी, प्रमुख अतिथी ग्रामसेवक मनोज मुडावार, उपसरपंच जगन्नाथ येलके, मुख्याध्यापक अरुण यामावार, कु. लाकडे मॅडम, प्रभाकर मरस्कोल्हे, सदस्य शा.व्य. समिती, सतिश शिंगाडे सर, सरिता शेडमाके, सीमा मरस्कोल्हे, अंगणवाडी सेविका,आदी उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनिषा बोंडे व कु. शिवानी येरमे तर आभार प्रदर्शन कु. चांदणी पोतराजे हिने केले.