Top News

कोलगावचे उर्वरित शेतजमीण अधिग्रहणासाहित पुनर्वसन निश्चीत #chandrapur #Rajura


माजी सभापती, सरपंच सर्वांनी मानले वेकोली महाप्रबंधकाचे आभार


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
राजुरा:- राजुरा तालुक्यातील कोलगाव हे गाव नदीच्या काठावर वसलेले असून दर वर्षी पुरामुळे शेतमालाचे व गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे कित्तेकदा पुरात लटकल्याने गावाला हवाई मार्गाने अन्न पूर्वठा पण करण्यात आलेला आहे.

अशा दयनीय अवस्थेत असलेल्या गावाला धोपताला ug to oc या प्रकल्पाचे काम सुरु होऊन नदीपात्रणजीक परिसरात मातीचे ढिगारे टाकल्या जात असल्याने गावाकऱ्यांची चिंता वाढली आणि भविष्यात मोठ्याप्रमाणात जीवीत हानी होण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने अडीच शे एकर जवळपास शेती उर्वरित असल्याने गावाकऱ्यांना गाव सोडून जाने हेही शक्य होत नव्हते अशा प्रसंगी कोलगावचे माजी सरपंच तथा उपसरपंच पुरुषोत्तम लांडे तथा त्यांचे कार्यकर्त्यांनी माजी सभापती सुनील उरकुडे तथा भाजपचे मधुकर नरड, प्रशांत घरोटे यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा obc आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज जी अहिर यांच्या वारंवार भेटी व अहिर यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखली वेकोली च्या क्षेत्रीय कार्यालयात महाप्रबंधक डे सर यांच्यासोबत वारंवार बैठका लावून वेळा काम बंद आंदोलने करत शेवटी वेकोली कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला.

त्या निर्णयानुसार कोलगाव वेशीतील उर्वरित शेती अधिग्रहन् करून गावाचे इतरात्र पुनरवसन करण्यात येणार आहे अशा मोठ्या निर्णयासाठी माजी सभपती सुनील उरकुडे व सरपंच पुरुषोत्तम लांडे सह भाजप चे पदाधिकारी मधुकर नरड, प्रशांत घरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रबंधक डे यांचे पुष्पगुछ देऊन आभार मानण्यात आले त्याप्रसंगी गावातील ग्रा प सदस्य अक्षय निब्रड, शामराव दिवसे,रामदास मोरे,रमेश् उरकुडे,निखिल वैद्य,सागर उरकुडे,बालाजी पिंपळकर,बालाजी काळे, जनार्दन देवाळकर, संजय पायगन,चंदू दिवसे,जग्गू लांडे,गणेश झाडे,राजू पिंपळकर तथा शेकडो गावकरी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने