Top News

बेकायदेशीर झोपडी तोडफोड प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल #chandrapur #pombhurna


बनावट प्लाॅट विक्रीचे प्रकरण

प्लाॅट विक्रीचा गोरखधंदा करणारा मासा गळाला अडकण्याची शक्यता


पोंभूर्णा:- शहरातील ओम नगर येथले सहा वर्षाअगोदर घेतलेल्या प्लाॅटवर बांधलेली झोपडी नुकसान करण्याच्या उद्देशाने चार इसमांनी जेसिबिने उद्धवस्त केल्याची घटना मंगळवारच्या रात्री घडली.

🏥
झोपडी तोडफोड करण्यापासून रोकण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्लाॅटधारकाच्या लहान भावाला चार जणांनी बेदम मारहाण केली व मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावून नेल्याच्या प्रकरणात पोंभूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून यातील पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

🏥
सदर आरोपींना पकडण्यासाठी दोन पथक रवाना झाले आहेत. पोंभूर्णा- गोंडपिपरी हायवेवर असलेल्या ओम नगर येथे संतोष भंडारवार यांनी येथील १५ लोकांना २०१६ मध्ये प्लाॅटविक्री केली होती. यात प्लाॅटविक्रेत्यानी प्लाॅट धारकांकडून पुर्ण पैसे घेऊन रजिस्ट्रेशन करण्याचा व ताबा घेण्याच्या संबंधाने नोटरी लिहून दिली होती. मात्र सहा वर्षांचा काळ लोटूनही ताबा मिळत नसल्याने प्लाॅट धारकांनी तकादा लावला मात्र प्लाॅट विक्रेत्यांनी पैस्याचे आमिश दाखवून व धमकी देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गोपाल नुतील कंठावार यांनी रजिस्ट्री करण्याची विनंती केली. संबंधित प्लाॅटविक्रेता संतोष भंडारवार यांनी गडचिरोलीच्या पेद्दूरवार या इसमाला बेकायदेशीररित्या ओम नगर येथील पंधरा प्लाॅटची विक्री केली. यामुळे मुळ प्लाॅटधारकाची मोठी फसवणूक झाली. याबाबत जाब विचारले असता भंडारवार यांनी उडवा उडवीचे उत्तर देत विषयाची बोळवण करीत होता.
🏥

ओम नगर येथील प्लाॅट नंबर ५९ मध्ये गोपाल कंठावार यांची झोपडी बांधलेली होती. मंगळवारच्या मध्यरात्री रूपेश पेद्दुरवार वय २७ वर्ष व अन्य तीन यांनी मंगळवारच्या मध्यरात्री जेसिबीच्या माध्यमातून झोपडी जमिनदोस्त केले. यावेळी प्लाॅटधारकाचा लहान भाऊ अरविंद नुतीलकंठावार घटनास्थळी जाऊन तोडफोड रोकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित चौघांनी त्याला जबर मारहाण केली व मारण्याची धमकी देत खिशात असलेला मोबाईल हिसकावुन नेल्याची घटना घडली.

🏥
सदर घटनेची तक्रार फिर्यादी अरविंद नुतीलकंठावार यांनी पोंभूर्णा पोलिसात दिली असून या प्रकरणाशी संबंधित पाच जणांवर कलम ३९४, ५०४, ५०६, १०९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🏥

सदर घटनेचे तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे,ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंदेवार करीत आहेत.आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने