Top News

ग्रंथदिंडीने दुमदुमली चंद्रपूर महानगरी #Chandrapurचंद्रपूर:- विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात ६८ वे विदर्भ साहित्य संमेलन चंद्रपूरातील अग्रणी शिक्षण संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ, गोंडवाना विद्यापीठ व सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६, १७ व १८ डिसेंबरला स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह आयोजित करण्यात आले.


विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने चंद्रपुरात 68वे विदर्भ साहित्य संमेलनास आजपासून प्रारंभ झाला. शुक्रवार दि. 16 डिसेंबर ला सकाळी 8 वाजता सरदार पटेल महाविद्यालयाच्या संयोजनात छत्रपती शिवाजी चौक येथून ग्रंथदिंडी निघाली

महात्मा गांधी चौक येथे महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बरी. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा, जटपुरा गेट येथे महात्मा गांधी पुतळा, पाणी टॉकी चौकात इंदिरा गांधी पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत भारतीय संविधान, दिव्य कुरआन, ग्रामगीता, श्रीज्ञानेश्र्वरी, संत रोहिदास चरित्र आणि चरित्र आणि वाङ्मय, पवित्र बाइबिल, बुध्द आणि त्यांचा धम्म, भगवद्गीता, लिळाचरित्रातील समाजदर्शन ग्रंथदिंडीत ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विवेक गौडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.‌ प्रशांत बोकारे, संमेलनाध्यक्ष डॉ. जोग तसेच अन्य मान्यवर यांची उपस्थिती होती. यात शाळा, महाविद्यालय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

ग्रंथदिंडी आकर्षण.....
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने