Top News

चंद्रपूर जिल्ह्यात आणखी चार वाघांचा मृत्यू #chandrapur# tiger #death #tadoba #andhari #tadobaandhari




चंद्रपूर:- दोन दिवसांपूर्वी ताडोबा व्याघ्र अभयारण्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दि. ३ डिसेंबरला पुन्हा ४ बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने ताडोबा प्रशासनात खळबळ उडाली आहे. एखाद्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने बछड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये एका बछड्याचा समावेश होता. ती घटना ताजी असतानाच आज सकाळी चार बछड्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात पट्टेदार वाघांचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने