Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

बोर्डा झुल्लूरवारच्या थेट जनतेतून सरपंचदी भाजपाच्या संगिता गव्हारे तर बोर्डा बोरकरच्या सरपंचपदी कांग्रेसच्या रोहिणी नैताम विजयी #chandrapurपोंभूर्णा:- तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून थेट जनतेतून सरपंच म्हणून बोर्डा बोरकरच्या कांग्रेसच्या रोहिणी नैताम तर बोर्डा झुल्लूरवारच्या भाजपाच्या संगिता गव्हारे विजयी झाले आहेत. झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनी एक भाजपाला तर एक कांग्रेसला आपली पसंती दिली आहे.

बोर्डा बोरकर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निकालात कांग्रेसच्या रोहिणी राकेश नैताम यांनी ५७२ मते मिळवून विजयी झाल्या तर भाजपाच्या अश्विनी संदिप कुनघाडकर यांना ३८६ मते मिळाली असून त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. बोर्डा बोरकर ग्रामपंचायतच्या विजयी सदस्यामध्ये वैशाली कुमरे (कांग्रेस)-२५८,बेबीनंदा वाघाडे(कांग्रेस)-२६०,अरविला सोपनकार (कांग्रेस)-२४९,लखन वैरागडे(कांग्रेस)-१२७,राहुल कुंभरे(कांग्रेस)-१५०,कल्पना शेडमाके (कांग्रेस)-१८६ तर निलेश नैताम (भाजपा)-१६१
एवढी मते मिळवून विजयाची माळ गळ्यात घातली.

-----------------------------------
बोर्डा झुल्लूरवार ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगिता राकेश गव्हारे यांना ३०८ मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत. तर कांग्रेसच्या अश्विनी धनराज बुरांडे यांना २५२ मते मिळाली असून त्या पराजीत झाल्या आहेत.
बोर्डा झुल्लूरवार ग्रामपंचायत विजयी सदस्यांमध्ये
अनुजा रामटेके(कांग्रेस)-१२७,
ललिता गद्देकार भाजपा-१२८,
पंकेश नैताम (भाजपा)-९३,
अमोल बुरांडे (भाजपा)-११८,
कविता राऊत (भाजपा)-९४,
आशिष देशेट्टीवार
(भाजपा)-बिनविरोध,
इंदुताई कुंभरे (भाजपा)-बिनविरोध
निवडून आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत