संक्रातीच्या तोंडावर 55 हजार रुपयांचा मुद्देमालासह धातुयुक्त मांजा जप्त chandrapur


चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात संक्रातीच्या मुहूर्तावर आलेल्या धातुयुक्त मांजावर पोलिसांची नजर पडली आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्वतः लक्ष घालून नष्ट न होणाऱ्या मांजाविरोधात धडक अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.

संक्रांत आणि पतंग हे पुरातन समीकरण आहे. आबालवृद्ध या पतंगबाजीचा आनंद लुटत असतात. मात्र या आनंदात गेली काही वर्षे धातुयुक्त मांजाने मोठे विघ्न आणले आहे. हा मांजा नष्ट होत नसल्याने मानव आणि पक्षी-प्राणी यांच्या मुळावर उठला आहे. आता पोलिसांनी या चीनी बनावटीच्या मांजावर कडक कारवाई करण्याचे ठरविले आहे.

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्वतः लक्ष घालून पतंग विक्रेत्यांविरोधात मुंबई पोलिस कायद्यानुसार कारवाई केली आहे. चंद्रपूर पोलिसांनी समाधी वार्डातील दुकानात छापा टाकून 55 हजार रुपयाचा मुद्देमाला सह नायलॉन मांजा जप्त केला आहे. बंदी असतांनाही नायलॉन मांजाची चोरी-छुपे विक्री होत असल्याची शहर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे हे छापे घालण्यात आले ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मांजाच्या चक्री आणि बंडल विक्री साठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनात आले.

या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अशा प्रकारची कुठे विक्री होत असल्यास पोलिसांना सुचित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत