Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

शिवसेनेच्या सरपंचासह ५ सदस्यांचा भाजपात प्रवेश #chandrapur #pombhurna


ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश
पोंभुर्णा:- ना.सुधीर मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक मंत्री म.रा. यांच्या विकासाच्या झंजावतामुळे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या नेतृत्वाखाली 15 जानेवारीला ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथील शिवसेनेच्या सरपंच सहित ५ सदस्यानी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

यामध्ये सरपंच सौ. संगीता मनोज कुळमेथे ग्रा. पं. सदस्य धनराज सातपुते, कांताबाई बुरांडे, निशा गदेकर, मारोती गेडाम, उमाजी उंदिरवाडे या सर्वांनी ना.सुधीर मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक कार्यमंत्री म. रा.यांच्या विकासकामांवर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील दोन वर्षात चक हत्तीबोडी ग्रामपंचायत वर शिवसेनेची सत्ता होती. तेव्हापासून गाव विकासापासून वंचित राहिलेला होता. तेथील पाणीपुरवठा योजनेची जठील बनलेली समस्या शिवसेना सोडवू शकलेली नसल्याने तेथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावरून शिवसेनेची विकासाची पोलखोल दिसून येते आहे. ना. सुधीर मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक मंत्री (म.रा.) हे मागील सरकारच्याकाळात अर्थमंत्री असतांना गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास फक्त नावापुरताच राहिलेला होता. आजचा पक्षप्रवेश हा पक्षाला अधिक पाठबळ ताकद देणार असा विश्वास यावेळी भाजपाचे राहुल संतोषवार यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित नगर पंचायत पोंभुर्णा उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी उपसभापती ज्योती बुरांडे, नगरसेवक दर्शन गोरंटीवार,पोंभुर्णा शहर भाजपा अध्यक्ष ऋषीजी कोटरंगे, ग्रा.पं. सदस्य तथा माजी सरपंच जयंत पिंपळशेंडे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत