'बबली'च्या परिवाराने घातली पर्यटकांना भुरळ #chandrapur #Tiger


चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे पर्यटकांना हमखास वाघांचे दर्शन होते. त्यामुळे ताडोबात पर्यटकांची संख्या वाढली आहे. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये म्हणून ताडोबा व्यवस्थापनाने कोअर झोन गेट व्यतिरिक्त बफर झोन क्षेत्र पर्यटकांसाठी खुले केले.
 त्यापैकी अलिझंझा बफर झोन गेट परिसरात सध्या बबली वाघिणीचे तीन बछडे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. बबलीचे बछडे आपल्या आईचे दूध पितानाचे दृश्य पर्यटकांना बघायला मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या