Top News

विद्यापीठ परिसराला वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव आम्हीच देऊ:- सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली #chandrapur#gadchiroli


बिरसा मुंडा, नारायणसिंग उईके, राजे विश्वेश्वर महाराज आमचेही श्रध्दास्थान


गडचिरोली:- 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या सिनेट सभेत केवळ एका नवनिर्मित सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आला आणि तो बहुमताने पारित झाला. दत्ताजी यांनी गडचिरोली येथे नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून प्रयत्न केले. पुढे त्याचे रूपांतर विद्यापीठात झाले. त्यामुळेच त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता.
🖼️

आदिवासी समाजातील श्रध्दास्थान असलेल्या आणि आम्हा सर्वांचे आदर्श असलेल्या समाजधुरिणांचे नाव डावलण्याचा कुठलाही हेतू नव्हता, राहणार नाही. किंबहुना, येत्या काळात गोंडवाना विद्यापीठाच्या संपूर्ण परिसरालाच वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यासाठी आम्ही सर्व सिनेट सदस्य प्रयत्न करू, असे स्पष्टीकरण गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी बुधवारी येथे पत्रपरिषदेत दिले.
🖼️

एका सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावरून आदिवासी समाजातील नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. या विद्यापीठाच्या नावातच ‘गोंडवन’ आहे. येत्या काळात विद्यापीठाच्या अनेक वास्तू उभ्या राहणार आहेत. मोठ्या परिसरात विद्यापीठाचे कॅम्पस तयार होणार आहे. त्यामुळे विविध वास्तूंना, परिसरांना आदिवासी समाजातील स्मृतिशेष मान्यवरांची नावे देण्यात येतीलच. त्यात भेदभाव करण्याचे कुठलेही कारण नाही. विद्यापीठ सर्वांचे आहे. सर्वांनाच चालवायचे आहे. त्यामुळे एका नावावरून असे वाद उभे राहणे आम्हालाही क्लेषदायक आहे. येत्या काळात अनेक आदिवासी समाजातील मान्यवर व्यक्तींच्या स्मृती विद्यार्थ्यांना प्रेरणा देत रहाव्या यासाठी योग्य ती पाऊले उचलण्यासाठी आम्ही सर्व सिनेट सदस्य कटिबध्द आहोत.

🖼️
स्व. दत्ताजी डिडोळकर यांनी आपले अवघे आयुष्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उन्नत भविष्यासाठी वाहिले. गरिब, होतकरू विद्यार्थ्यांची नागपूरला राहण्याची, भोजनाची व्यवस्था व्हावी म्हणून त्यांनी आपले राहते घर उघडे केले होते. त्यांचे घर जणू विद्यार्थ्यांचे वसतीगृह होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षण आणि त्यांच्या प्रगतीसाठी निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणीसाठी आग्रह धरला.
🖼️

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांना लहान मोठ्या कामासाठी नागपूरपर्यंत जावे लागू नये यासाठी त्यांनीच पुढाकार घेऊन गडचिरोलीत नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणूनच त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो लोकशाही पध्दतीने पारित केला गेला, असेही सिनेट सदस्य म्हणाले.

🖼️
गुरुदास मंगरुजी कामडी
अधिसभा सदस्य
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
१.प्रशांत दोंतुलवार
२.संजय रामगिरवार
३.स्वरूप तारगे
४.स्वप्नील दोंतुलवार
४.धमेंद्र मुनघाटे
५.सौ.किरण गजपूरे
६.प्राचार्य चंद्रशेखर कुंभारे
७.प्रा. सुधिर हुंगे
८.यश बांगडे

1 टिप्पण्या

  1. गोंडवाना विद्यापीठाला फक्त वीर बाबूराव शेडमाके हेच नाव देण्यात यावे, अन्यथा गोंड़ जातीच्या वर्ती च गोंडवाना विद्यापीठ जसेच्या तसेच राहु द्यावे।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने