डिकेपीएल सिजन ४ चा समारोप उत्साहात साजरा #DKPL-4 #chandrapur #Rajura #cricket


प्रथम क्रमांक खुशी स्टार्स संघाला एक लक्ष रुपये; पंधरा संघानी घेतला सहभाग


राजुरा:- आयपीएल च्या धर्तीवर राजुरा येथे धनोजे कुणबी युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ द्वारा आयोजित मॉर्निंग क्रिकेट क्लब, राजुरा व रॉयल क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डीकेपीएल सिजन - ४ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर केले होते. पंधरा दिवस चाललेल्या स्पर्धेचा अंतिम सामना (दि. १५) खुशी स्टार व मराठा राजे या संघात झाला यात खुशी स्टार्स संघाने एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस, द्वितीय मराठा राजे यांनी पन्नास हजार रुपयांचे बक्षीस तर तिसरे बक्षीस राईज अकादमी संघाला तीस हजार रुपये मिळाले.

समारोपीय बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप प्रमुख अतिथी चंद्रपूर धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, राजुरा धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष दौलतराव भोंगळे, सचिव देवराव निब्रड, नरेंद्र काकडे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, रंजन लांडे, बबन उरकुडे, नामदेव गौरकार, ओंकार आस्वले, किशोर गुरू, सचिन डोहे, डॉ. अशोक जाधव, लखन जाधव, पत्रकार संघाचे सचिव श्रीकृष्ण गोरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन यांची उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनराव चटप यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले की, मागील चार वर्षांपासून येथील धनोजे कुणबी युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डीकेपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले जात आहे. खेळ म्हणल्यानंतर जय-पराजय असतेच जो संघ जिंकला आहे त्यांना आनंद होतो तर पराभव झालेल्या संघाने खचून न जाता आपल्या खेळात आनंद लुटायला हवा, सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत राजुरा विधानसभा क्षेत्र व त्या बाहेरील खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची व समोर जाण्याची संधी मिळाली आहे. एकूण पंधरा संघ मालकांनी आपल्या टीम खेळविल्या आहे. आयोजकांकडून लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली होती ती पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना व संघाना वितरित करण्यात आली. किशोर गुरू यांचेकडून प्रत्येक दिवशी खेळणाऱ्या संघाला स्मृतिचिन्ह दिले.

समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन भोयर यांनी तर कार्यक्रमाचे संचालन केतन जुनघरे यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी मंडळाचे सचिन भोयर, राजकुमार डाखरे, केतन जुनघरे, नीरज मत्ते, रुपेंद्र ढवस , निलेश भोयर, महेश सूर्यवंशी, बंटी मालेकर, रतन काटोले, मयूर झाडे, चेतन काटोले, चेतन सातपुते, स्वप्नील पहानपटे, शुभम राखुनडे, छोट्टू मसादे, अनिकेत बेलखेडे, समाधान मोरे, अमोल नागपुरे, शुभम बोर्डेवर, मारोती आईलवार, प्रणय विरमलवार, अनिकेत गिरसावळे, मयूर इटनकर, अंकित पडवेकर यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत