Top News

10 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत हत्तीरोग व अंडवृद्धी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेस सुरुवात #chandrapur #pombhurna


नागरीकांनी गोळ्या खाऊन सहकार्य करण्याचे आवाहन


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा हा हत्तीरोग तसेच अंडवृद्धीसाठी अतिसंवेदनशील जिल्हा आहे. दूषित क्युलेक्स डासाच्या चावण्यामुळे सुदृढ माणसाला हत्तीरोग तसेच अंडवृद्धी होत असते. जिल्ह्यात सन-2022 मध्ये एकूण 3 हजार 67 अंडवृद्धी रुग्ण होते. त्यापैकी 630 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे अंडवृद्धी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते. अंडवृद्धी झालेल्या रुग्णांकरीता कुठलाच उपचार उपलब्ध नसून शस्त्रक्रिया करून घेणे हाच एकमेव उपचार आहे.

दि. 10 ते 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्ह्यातील चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी, पोभूर्णा, मूल, सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी या 9 तालुक्यांमध्ये सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला सुरुवात होत आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका प्रत्येक घरी जाऊन प्रत्यक्ष गोळ्या खाऊ घालणार आहे. हत्तीपाय व अंडवृद्धीपासून सुरक्षित राहण्याकरीता प्रत्येक नागरिकांनी आरोग्य कर्मचारी व अशा स्वयंसेविका यांच्या समक्ष ह्या गोळ्या खाणे अपेक्षित आहे. जेणेकरून, नवीन आढळून येणाऱ्या हत्तीरोग व अंडवृद्धी रुग्णास आळा घालता येईल.

या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांना सहकार्य करावे व प्रत्येक नागरिकांनी गोळ्या खाव्यात व हत्तीपाय तसेच अंडवृद्धीपासून सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने