रणदिवे यांच्या देशी दारूच्या दुकानात चोरी #chandrapur

25 पाट्या चोरट्याने केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील राजीव गांधी (पेट्रोल पंप) चौक,रेल्वे स्टेशन रोड वरील मे.रणदिवे यांच्या दारू दुकानात 6 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी दारू दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे 25 देशी दारूच्या पेट्या लंपास केल्या आहे.

रणदीवे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.चोरीची शंका व्यक्त करत घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली.

सदर चोरटे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले असून पोलीसांकडून तपास सुरू आहे.एका निळ्या रंगाच्या कारमधून अंदाजे 90 हजार रूपये किमतीच्या राकेट कंपनीच्या 25 पेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची माहीती संजय रणदिवे यांनी दिली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सीसीटीव्हीच्या आधार पोलिस चोरीचा तपास करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत