Top News

आंतर महाविद्यालयीन मुलांच्या नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय दुसऱ्या स्थानावर #chandrapur #netball



चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय मुलांच्या संघाने रौप्यपदक पटकाविले. प्रथम स्थानावर राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, दुसऱ्या स्थानावर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर तर तिसऱ्या स्थानावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा होते. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धा डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेकरिता चंद्रपूर परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर हे राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर ला पराभूत झाल्याने विद्यापीठाचे रौप्यपदक पटकाविले.

मुलामध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता ओम भोयर, सचिन वाघाडे, प्रतिक हुसे, निखिल कोंडेकार, दुष्यांत चन्ने, सिध्दार्थ निमसरकार, धनपाल चनकापुरे यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विजेता संघात दर्शन मेश्राम, मुबारक शेख, भैरव दिवसे यांचा समावेश होता.

संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर गोंड, हनुमंतु डबारे, चेतन इदगुरवार तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने