चंद्रपूर:- आर्य वैश्य समाज स्पोर्ट्स क्लब तर्फे कोमटी प्रीमिअर लीग-2023 सिजन 4, नाईट टेनिस क्रिकेट सामने व आनंद मेळावाचे यशस्वी आयोजन चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे 17, 18, 19 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले. या भव्य लिग मध्ये 8 पुरुषांच्या टीम व 4 महिलांचे टीम नी सहभाग घेतला.
सर्व सामने अतिशय रोमहर्षक झालेत. यात पुरुषांच्या स्पर्धेत OS Tiger हे प्रथम विजेते ठरले, तर वासवी डेअरडेविल्स हे उपविजेते ठरले, व चिंतामणी फायटर्स यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले,. मालिकावीर पुरस्कार मनीष गण्यारपवार यांना देण्यात आला, तसेच महिलांचा स्पर्धेत श्री कन्यका वॉरीअर्स अव्वल ठरले तर क्वीन 11 उपविजेते ठरले, सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन आर्य वैश्य समाज स्पोर्ट्स क्लब, चंद्रपूर तर्फे करण्यात आले. व पुढील वर्षी क्रीडा महोत्सव घेण्यार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.