Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बिबट्याचा महिलेवर हल्ला #chandrapur #Leopard #Bhadrawati


गंभीर अवस्थेत चंद्रपूरला उपचारार्थ दाखल


भद्रावती:- आयुध निर्माण येथील सेक्टर पाच लोकवस्तीतील बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारार्थ चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरीकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला करणाऱ्या बिबट्याचा घटनास्थळ परिसरात वावर आहे.

विमलादेवी टिकाराम ही 42 वर्षीय महीला नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाली असता या भागात बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला महिलेच्या मानेच्या मागील भागास गंभिर दुखापत केल्याने आयुध निर्माणी च्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारार्थ चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. ही घटना दि. २० फेब्रुवारीला सायं. ६.१५ वाजता घडली.

याच भागात दि. १८ फेब्रुवारीच्या पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट जेरबंद झाल होता. या लोकवस्तीत अनेक हिंस्र प्राणी वन्य प्राण्याचा वावर आहेत. वनविभाने आयुध निर्माणित प्रशासनाला मानव वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतू त्यांनी अजूनपर्यंत दिलेल्या सूचना अमलात आणल्या नाही. नागरीकांनी सोबत कुत्र्यांना घेऊन फिरू नये, कुत्रे पाळू नये आणि पहाटे, सायंकाळी व रात्रीला रस्त्याने पायदळ, सायकल व दुचाकीने फिरू नये अशा बुचना दिल्या होत्या. परंतू याचे पालन केल्या जाती नाही. या भागात पिंजरे लावले असून घटनेची माहीती मिळताच क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी भेट देवून महिलेला पुढिल उपचारार्थ चंद्रपूरला खाजगी रुग्णालयात रवाना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत