पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी सरपंच हरीश ढवस, प्रमुख पाहुणे रमेश कुमरे उपसरपंच, विजय बोडेकर सदस्य, प्रदीप पा. दिवसे, अनंता दिवसे, मुरलीधर ढवस, उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मालर्पण करण्यात येऊन वंदन करण्यात आले. यानंतर माजी सरपंच हरीश ढवस यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रवर मार्गदर्शन करून युवकांना शिवाजी महाराज यांचे विचार अगीकरून, प्रेरणा घेऊन जीवन जगावे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोट्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी साहिल दिवसे, गणेश मोरे, तुळशीदास खुजबुरे, मयूर दिवसे, तेजस दिवसे, कृणाल कोपवार, सुरज कुळमेथे, देवानंद मोरे, मोहित कुडमेथे रोहित पावडे, धनराज दिवसे, भूषण बोडेकर, सौरव कुडमेथे, निशांत खुजबुरे, निशांत दिवसे, रुपेश मोरे, सागर खुजबुरे, महेश दिवसे यांनी अथक परिश्रम घेतले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत