Top News

गोंडपिपरी नगरपंचायत येथील नगराध्यक्षांवर अपात्रतेची सुरज ठाकरे यांची मागणी


गोंडपिपरी:- गोंडपिपरी नगरपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा मध्ये कायद्याची उल्लंघन करून बेकायदेशीर रित्या निविदा काढण्यात आल्याच्या तक्रारी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना प्राप्त होताच त्यांनी माहिती अधिकारांतर्गत सदर निवेद्य संदर्भात संपूर्ण माहिती घेतली असता काही आश्चर्यजनक पुरावे हाती लागले. त्यामध्ये गोंडपिंपरी नगरपंचायत अंतर्गत निविदा सूचना क्रमांक/कार्या/नापगो/१६६/२०२२ दिनांक- ०५/०५/२०२२ अंतर्गत तब्बल १५ विविध कामांकरिता साप्ताहिक पुरोगामी संदेश यातील पृष्ठ क्रमांक ४ वर निविदा सूचना देण्यात आली होती. यावर श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यासह गोंडपिंपरी नगरपंचायत अंतर्गत विद्यमान नगरसेवकांनी देखील आक्षेप घेतला आहे. कारण शासकीय कामासंदर्भात निवेदेची जाहीर सूचना ही कायद्याने दैनिक वर्तमानपत्रांमध्ये देणे बंधनकारक आहे . परंतु सदर गंभीर बाब प्रशासनाद्वारे गांभीर्याने न घेतल्यामुळे निविदा प्रकाशित होवून कामे वितरीत देखील करण्यात आली आणि कामे देताना नगराध्यक्ष व त्यांच्या समर्थक ठेकेदारांना सर्व कामे मिळाली जे बेकायदेशीर असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे तसेच या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून , अग्निशामक विभागाच्या वाहनावर वाहन चालक व फायरमन म्हणून पदाचा लाभ मिळवलेल्या नावे अनुक्रमे १) अमोल कुळमेथे २) सत्यपाल पुणेकर यांनी तर एकाच प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण दाखला मिळविला व त्या प्रशिक्षण संस्थेचा मुख्य कार्यालयाचा पत्ता शांती नगर ,नागपूर असून त्या ठिकाणी प्रत्यक्षात भेट दिली असता सदर संस्था गेल्या १० वर्षांपासून त्या पत्त्यावर नसल्याचे समजले .अश्या संस्थेचे एक वर्षीय प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र जोडल्याची धक्कादायक बाप निदर्शनास आली आहे.

तसेच मनुष्यबळ पुरवठ्याच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम देऊन त्याच्या माध्यमातून हवा तसा आर्थिक लाभ नगराध्यक्ष व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी मिळविला असल्याचे खात्रीलायक माहिती सुरज ठाकरे यांनी त्यांच्या कडे असल्याचा दावा केला आहे.

या सर्व बाबींचा आधार घेत या सर्व निविदा तात्काळ रद्द करून निविदेला न्याय मिळवून देण्याकरिता व कामांना न्याय मिळवून देण्याकरता लोकशाही मार्ग व कायदेशीर पद्धतीने दैनिक वृत्तमान पत्रांमध्ये सदर सर्व १५ कामासंदर्भात पुन्हा जाहिरात देऊन सर्व कामांना शासकीय पद्धतीने प्रोसीडींग प्रमाणे पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुरज ठाकरे यांनी केली आहे.

       तसेच आपल्या पदाचा गैरउपयोग करून आपल्या नातेवाईकांना काम मिळवून देणे तसेच बेकायदेशीर रित्या कामाच्या निविदा काढून त्या माध्यमातून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम मिळवून दिल्यामुळे गोंडपिंपरी नगरपंचायत मधील विद्यमान महिला नगराध्यक्षा सौ.सविता बबलू कुळमेथे यांच्यावर कार्यवाही करत त्यांना अपात्र घोषित करावे ही मागणी सुरज ठाकरे यांनी केली आहे 

 यापूर्वी देखील माननीय उच्च न्यायालयाने अश्याच अनेक प्रकरणामध्ये अपात्र ठरविल्याने  निकाल दिलेले आहेत त्याचा आधार घेत या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी लावून ३० दिवसांच्या आत मध्ये या  प्रकरणामधील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करत तसे न झाल्यास ३० दिवसानंतर स्वतः गोंडपिंपरी नगरपंचायत समोर सहकाऱ्यांसह आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे .
आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ता परिवर्तन होईल की काय अशी खमंग चर्चा नागरिकांमध्ये आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने