Top News

कापड दुकानाला भीषण आग #chandrapur #Mul #fire #firenews



मुल:- मूल (जि. चंद्रपूर) पोलिस ठाण्याला लागून असलेल्या कापड दुकानाला आज (दि. ९ फेब्रुवारी) पहाटे आग लागली. या दुर्घटनेत ५० ते ६० लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुकानातील इनव्हर्टरमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मूल येथील दत्तात्रय गोगीरवार यांचे सोमनाथ रोडवर पोलिस स्टेशन जवळ कापड दुकान आहे. गुरुवारी पहाटे दुकानाला आग लागली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस, नगरपालिकेचे कर्मचारी आणि माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्‍निशमन दलाच्‍या कर्मचार्‍यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मूल आणि सावली येथील अग्‍निशमन विभागाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आगीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीमध्ये दुकानातील विविध प्रकारच्या कापडाचे पूर्णत: नुकसान झाले होते. काउंटर वरील लॅपटॉप आणि हिशोबाचे दस्ताऐवज, छतावरील पीयुपी, इलेक्टिक वायरिंग जळून खाक झाली.

पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान

आगीत दत्तात्रय गोगीरवार यांचे पन्नास ते साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. वेळीच आग नियंत्रणात आल्याने लगतच्या अन्य दुकानांना आगीची झळ पोहचली नाही. .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने