दुचाकी अपघातात तरूण ठार, एक गंभीर #chandrapur #accidentचंद्रपूर:- भरधाव दुचाकीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ शनिवारला रात्री 90.30 वाजताच्या सुमारास घडली. राकेश टोमदेव नवघडे (27) असे मृतकाचे नाव असून, तो निफन्द्रा येथील रहिवाशी होता. तर अमोल जनार्धन चौधरी (22, रा. बारसागड) असे जखमीचे नाव आहे.

महाशिवरात्रीनिमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे मोठी यात्रा भरते. त्यामुळे विदर्भाच्या कान्याकोपर्‍यातून भाविक या ठिकाणी येतात. या यात्रेसाठी सावली तालुक्यातील अनेक भाविक जातात. घटनेच्या दिवशी मृतक राकेश हा आपल्या वडिलाच्या मृत्यू पश्चात मित्र अमोलसह दुचाकी (क्रमांक एमएच 34 व्ही 7520) ने मार्केंडा येथे आंघोळीला गेला होता. त्यानंतर गावाकडे परतत असताना सावली तालुक्यातील चंद्रपूर -गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीचा टायर अचानक फुटल्याने दोघेही दूचाकीवरून खाली कोसळले. यात राकेश नवघडे जागीच ठार झाला, तर अमोल गंभीर जख्मी झाला. जखमीला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले. मृतकाच्या पश्चात आई, पत्नी असा आप्त परिवार आहे. राकेशच्या अकाली निधनाने परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत