ना. सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते महाराष्ट्र राज्यगीताचे चंद्रपूरात शुभारंभ #chandrapur

चंद्रपूरात घुमला 'जय भवानी.... जय शिवाजी'चा जयजयकार


चंद्रपूर:- चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे रविवार 19 फेब्रुवारीला शिव जयंती उत्सवाचे आयोजन सकाळी 9 वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य,वन व मत्स्यपालन व्यवसायमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते ''जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा...''या राज्यगीताचे शुभारंभ पटेल हायस्कुल समोरील शिव स्मारक येथे केले.


''जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा'' हे गीत राज्य शासनाने ''राज्यगीत म्हणून नुकतेच स्विकारले आहे.छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती 19 फेब्रुवारी 203 पासून हे गीत प्रत्येक शासकीय कार्यक्रमात वाजविले किंवा गायले जाणार आहे.


मागील 6 दशकापासून राज्यगीताची मागणी प्रलंबित होता. सांस्कृतिक कार्यमंत्री ''सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या भगीरथ प्रयत्नातून अखेर 30 जानेवारीला मंत्रीमंडळाने ''जय जय महाराष्ट्र माझा'' या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला. दि. 1 फेब्रुवारी 2023 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासकिय परिपत्रकानुसार कविवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा असे हे राज्यगीत असून, शिव जयंती पर्वावर आयोजित या ऐतिहासीक सोहळ्याचे साक्षीदार झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या