निलजई वेकोली कोळसा खाणीच्या बंकरमध्ये भीषण आग #chandrapur #fireचंद्रपूर:- वणी वेकोली क्षेत्रातील निलजई कोळसा खाणीतीत बंकरमध्ये शनिवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली. यामध्ये कोणतीही जिवतीहाणी झाली नसून करोडोची वित्तहाणी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या घटनेने निलजई खुल्या कोळसा खाणीमध्ये एकच खळबळ उडाली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी वेकोली क्षेत्रातील निलजई खुल्या कोळसा खाणीतून प्रतिदिन हजारो टन कोळसा काढला जातो. या ठिकाणावरून निघणारा कोळसा विविध ठिकाणच्या उद्योगांना पुरविला जातो. त्यामुळे येथून लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते. शनिवारी खुल्या कोळसा खाणीतील सिएचपी बंकरमध्ये कामगार कोळसा काढण्याचे काम करीता असताना अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर खाण व्यवस्थापनाने तातडीने कामगारांना सुरक्षित स्थळी हलवले व आग विझविण्यास सुरुवात केली. बंकर सिएचपी मध्ये कोळसा उत्पादनाकरीता महागडे यंत्रे सामुग्री होती. या यंत्र सामुग्रीला आगीचा विळखा झाल्याची माहिती आहे.

सुदैवाने यामध्ये कामगार सुरक्षित स्थळी असल्याने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बंकरमध्ये आग लागल्याने मोठी वित्तहानी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काही यंत्रे जळाल्याचीही माहिती समोर आली आहे. दुपारनंतर आग विझविण्याकरीता खाण व्यवसथापनाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या घटनेने वणी वेकोली क्षेत्रातील निलजई कोळसा खाणीत एकच खळबळ उडाली होती. कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत