Top News

आंतर महाविद्यालयीन सेपक टकरा स्पर्धेचे आयोजन संपन्न #chandrapur #Korpana #Gadchandur


सरदार पटेल महाविद्यालय मुलांच्या संघाने तिसरा क्रमांक तर मुलींच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सेपक टकरा स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने कांस्य पदक तर मुलींच्या संघाने रौप्य पदक पटकाविले. मुलांच्या स्पर्धेत प्रथम स्थानावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, दुसऱ्या स्थानावर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर तर तिसऱ्या स्थानावर राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर होते.

मुलींच्या स्पर्धेत प्रथम स्थानावर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर होते. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धा शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथे आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेकरिता चंद्रपूर परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर मुलांच्या संघाने राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर ला पराभूत करत विद्यापीठाचे कांस्यपदक पटकाविले. तर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर मुलींचा संघ आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा ला पराभूत होत विद्यापीठाचे रौप्यपदक पटकाविले.

मुलांमध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता अभिमन्यू आर्य, मोहम्मद हकीम, संदिप राय यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विजेता संघात रवी राजभर, भैरव दिवसे यांचा समावेश होता.

मुलींमध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता गायत्री इटनकर, श्रुतिका वानखेडे, वैष्णवी मेश्राम यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विजेता संघात संदेशा निकोडे यांचा समावेश होता.

संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर गोंड, हनुमंतु डबारे तसेच प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने