पोलिसांना तिसऱ्या डोळ्याचा विसर? #Chandrapur #Korpana


चोरीचे प्रकार वाढले; सीसीटीव्ही बंद?

कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर मोठे औद्योगिक शहर असून या परिसरातील आजूबाजूला चार मोठे सिमेंटचे कारखाने आहेत व गडचांदूर शहर ही मोठी बाजारपेठ आहे. नुकतीच शहरामध्ये काही दिवसांपूर्वी देशी दारूच्या दुकानांमध्ये चोरी झाली होती, आणि त्यामध्ये २५ पेट्या दारू व चिल्लर रक्कम असे एकूण एक लाख रुपयांची चोरी झाली होती. परंतु त्या चोरांना पकडण्यास अजूनही पोलिसांना यश आलेले नाही. शहरात अवैध वाहतूक, अवैध धंदे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून तिसरा डोळा म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे व ते अजूनपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर चोर सापडले असते. येथील बसस्थानकावर सकाळ सायंकाळच्या वेळेस महाविद्यालय, शाळेचे विद्यार्थी एस.टी.ची वाट पाहत असतात. राजुरा ते आदिलाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जडवाहतूक चालत असते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असणे आवश्यक आहे.

गडचांदूर पोलिस स्टेशनमध्ये नवीन पोलिस निरीक्षक म्हणून रवींद्र शिंदे रुजू झाले असून ते याकडे लक्ष देतील का? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत