Top News

५०० रुपयांची लाच भाेवली; 'आरटीओ इन्स्पेक्टर'सह दाेघे 'एसीबी'च्या जाळ्यात #chandrapur #Nagpur #arrested


नागपूर:- वाहन चालान केल्यानंतर ट्रकचालकाला माेटार वाहन निरीक्षक (आरटीओ इन्स्पेक्टर) यांच्या अतिरिक्त ५०० रुपयांची मागणी करणाऱ्या दाेन खासगी व्यक्तींसह आरटीओ इन्स्पेक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.

ही कारवाई नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री (ता. रामटेक) येथील 'आरटीओ चेकपाेस्ट' येथे बुधवारी (दि. ८) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षक अभिजित सुधीर मांजरे (३९) यांच्यासह करण मधुकर काकडे (२८, रा. हिवरा-बेंडे, ता. रामटेक) व विनोद महादेवराव लांजेवार (४८, रा. सुभाषनगर, कामगार कॉलनी, नागपूर) या दाेघांचा समावेश आहे. तक्रारकर्ता ट्रकचालकाने त्याच्या ट्रकमध्ये मनमाड (जिल्हा नाशिक) येथून साहित्य घेतले आणि ते घेऊन रिवा (मध्य प्रदेश) येथे जात हाेता. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री शिवारात असलेल्या 'आरटीओ चेकपाेस्ट'वर त्याचा ट्रक चालान करण्यात आला.

तिथे करण व विनाेद या दाेघांनी त्याला चालान व्यतिरिक्त ५०० रुपयांची मागणी केली. ट्रकचालकाने लगेच 'एसीबी'कडे तक्रार नाेंदविली आणि तक्रार प्राप्त हाेताच 'एसीबी'ने सापळा रचला. अभिजित मांढरे यांच्या केबिनमध्ये व त्याच्या उपस्थितीत ही लाच स्वीकारत असताना 'एसीबी'च्या पथकाने त्या दाेघांसह अभिजित मांढरे यांना ताब्यात घेत अटक केली. अभिजित मांढरे यांनी स्वत:लाच स्वीकारली नसली तरी त्यांनी त्या दाेघांना लाच घेण्यास प्राेत्साहन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, संशोधन २०१८ अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. ही कारवाई 'एसीबी'चे पाेलिस अधीक्षक राहुल माकनीकर व अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगीता चाफले, पोलिस निरीक्षक वर्षा मते, आशिष चौधरी व नीलेश उरकुडे, अमोल मेंघरे, अनिल बहिरे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने