Top News

फूड प्रोडक्ट कंपनीच्या फ्रँचाईसीसाठी १५.७१ लाखांनी फसविले #chandrapur #Nagpur #fraud


नागपूर:- फूड प्रोडक्ट कंपनीची फ्रँचाईसी देण्याच्या नावावर ऑनलाईन १५.७१ लाख भरण्यास सांगून फ्रँचाईसी न देता फसवणूक केल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. राहुल दिलीप मुपीडवार (३५, शिवमंदिर, ग्रामपंचायतजवळ, येरखेडा) यांनी खाजगी व्यवसाय करण्यासाठी गुगलवर सर्च केले असता आरोपी मोबाईल क्रमांक ८९८१३११५५१ चा धारक उमेन्द्रकुमार लहरे याने आपण फूड प्रोडक्ट कंपनीचे काम करीत असल्याची बतावणी केली.

कंपनीची फ्रँचाईसी मिळविण्यासाठी त्याने राहुल यांना १५ हजार ५०० रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून १५ लाख ७१ हजार रुपये ऑनलाईन भरायला लावले. पैसे भरल्यानंतरही आरोपीने फ्रँचाईसी न देता राहुल यांची फसवणूक केली.
राहुल यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (ड), माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने