बनावट सह्या करून हडपला भूखंड #chandrapur #Nagpur

Bhairav Diwase

नागपूर:- दोन आरोपींनी लाखोंचा भूखंड एका महिलेचे बनावट बहीण-भाऊ दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून हडपला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली. मोहम्मद इमरान मो. बद्रूद्दीन (फ्रेंड्स कॉलनी) आणि दिनेश शंकरराव जाधव (४३, जाततरोडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमिला किशोर गायकवाड (५०, शनिवारी, कॉटनमार्केट) यांचा गोरेवाडा येथे वडिलोपार्जित भूखंड आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्या भूखंडाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यामुळे, आरोपी मो. इमरान याने दिनेश जाधव याला हाताशी धरले. प्रमिला यांचे भाऊ आणि बहीण यांच्या जागेवर बनावट पुरुष व महिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. भूखंडाचे मूळ मालक असल्याचे दाखवून त्यांची बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्रे तयार केली. त्यावरून तो भूखंड परस्पर आपल्या नावे केला. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला.