नागपूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये नागपूर विभागातील आठ विद्यार्थांनी कॉपी केल्याचे पुढे आले आहे.
बारावीच्या शालांत परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. नागपूर विभागातून १ लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर, ४८४ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. नागपूर विभागातील या केंद्रामध्ये राबविलेल्या मोहिमेत आठ विद्यार्थांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
यामध्ये, गोंदियामध्ये सर्वाधिक ५, चंद्रपूरमध्ये २ आणि वर्धामधील एका प्रकरणाचा समावेश आहे. तर, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली एकही कॉपीचे प्रकरण पुढे आले नाही. शिक्षण मंडळाने परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवली होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत