घरकुल बाधकामाची भिंत कोसळून लाभार्थी गंभीर #chandrapur

Bhairav Diwase
0


आरमोरी:- घरकुलाचे बांधकाम करताना भिंत कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना येथील बाजार टोली येथे घडली. आरमोरी बाजार टोली येथील गरीब घरकुल लाभार्थी जगन मारोती मेत्राम (46) यांना नगरपरिषद अंतर्गत घरकुल मजुर झाले.

त्यामुळे ते घराचे बांधकाम सुरू केले आहे. यात घरकुल लाभार्थी अत्यंत गरीब असल्यामुळे आपला घरकुल कमी खर्चात व्हावा. आणि मजुरांची मजुरी भरमसाठ वाढल्यामुळे घरकुल अनुदानात बांधकाम होत नाही.

याचा विचार करून लाभार्थी मेश्राम यांनी स्वत: घरकुल बांधकामावर काम करीत असताना अचानक भिंत त्यांच्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. काही ते वेळ भिंतीच्या आत दबून असल्याचेही सागण्यात आले. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोज बोरकर यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिली असता, त्यांनी कसलाही विलंब न लावता आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय गाठून अपघातग्रस्ताच्या उपचारासाठी सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धात्रक यांनी उपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यावेळी मनोज बोरकर, संतोष कराकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)