श्री. माता महाकाली क्रिडा महोत्सव-२०२३ #chandrapur #Netball


नेटबॉल स्पर्धेत क्रिडा संकुल पोंभुर्णा (मुले) आणि चिंतामणी कॉलेज (मुली) तिसऱ्या स्थानावर


चंद्रपूर:- द डिस्ट्रिक्ट अथेलेटिक संघटना यांच्या सहकार्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री श्री. माता महाकाली क्रिडा महोत्सव-२०२३ चे आयोजन चंद्रपूर शहरातील विविध भागात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.

यात नेटबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे दि. २५, २६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले. यामध्ये क्रीडा संकुल पोंभुर्णा (मुले) आणि चिंतामणी कॉलेज (मुली) तिसरा क्रमांक पटकावला.

खेळाडू म्हणून क्रीडा संकुल पोंभुर्णा मुलांच्या संघात जयंत टेकाम, अयाज शेख, सुरज ढोले, चिराग, कृष्णा सिडाम, राकेश देवतळे, गौरव चंदेल, गणेश हेपट तर चिंतामणी कॉलेज (मुली) मयुरी भुरसे, सोनाली मोहुर्ले, भारती सोमनकर, दुशिला, मोनी, धनश्री पिपरे, सोनी, तनवी, आश्लेषा, पुमेश्वरी यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत