महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभाग मार्फत गट कार्यालय चंद्रपूर अंतर्गत गडचांदुरात टि -10 टेनिस बॉल क्रिकेट सामने संपन्न #Gadchandur

Bhairav Diwase
0


गडचांडुर:- कामगार कल्याण केंद्र, बललारपूर केंद्राच्या वतीने विदर्भ महाविद्यालय, गडचांदूर येथील ग्रॉऊन्ड वर भव्य कामगार प्रिमियम लिग T10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दि.27.2.2023 ते 28.2.2023 रोजी दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन दि.27.2.2023 रोजी उद्‌घाटन / अध्यक्ष- सतिश बिडकर, प्रहार संघटना गडचांदूर तालुका अध्यक्ष, नंदलाल राठोड सहाय्यक कल्याण आयुक्त, नागपूर, मा. एस.एस. पुनीया, कामगार संघटना प्रतिनिधी, माणीकगढ सिमेंट, मा. अमानत अली, उपाध्यक्ष कामगार संघटना माणीकगढ सिमेंट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.               
     स्पर्धेचे  प्रास्ताविक मार्गदर्शनपर भाषण राठोड यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या योजना व उपक्रमाची सविस्तरपणे माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात  बिडकर यांनी कामगारांनी सुद्धा क्रीडा क्षेत्रात  येऊन आपली कलागुण  दाखवली पाहिजे व कामगार कल्याण मंडळाच्या अनेक योजना व उपक्रमात नक्की सहभागी व्हायला पाहिजे तर आभार प्रदर्शन रामेश्वर अळणे, कामगार कल्याण अधिकारी, चंद्रपुर यांनी केले.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  चंद्रपूर गटातील श्री. दौलत गोरेजी, श्री. प्रशांत देशपांडे, श्री. करण थुल, यांनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
  दि.28.2.2023 रोजी अंतिम स्पर्धा होवून पारितोषीक वितरण समारंभ करण्यात आले 

*महाराष्ट्र शासन कामगार विभाग
 महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
 रविराज ईळवे कल्याण आयुक्त मध्यवर्ती कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्य, यांचे संकल्पनेतून गट कार्यालय चंद्रपुर अंतर्गत कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर द्वारे गडचांदूर या शहरात भव्य कामगार प्रीमियर T10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिनांक २७/०२/२०२३ ते २८/०२/२०२३ या कालावधीत विजयी संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले 
१) अंबुजा सिमेंट कामगार संघ (चंदु दुरडकर)
२) अल्ट्राटेक सिमेंट आवरपुर(प्रकाश कुमरे)
३) मानिकगड सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक गडचांदुर
 (प्रविण भक्तुभाऊ सातपाडे)
४)GLP contraction  मानिकगड वर्क्स अल्ट्राटेक सिमेंट 
गडचांदुर (मधुभाऊ राठोड) 
५)मानिकगड सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक गडचांदुर
( नितेश सातखरे) 
सिमेंट पॅकिंग प्लांट
६) विद्युत महामंडळ गडचांदूर (राजकुमार रोहने)
७) दालमिया सिमेंट नारंडा 
   (प्रकाश इंगोले)
८)SKS construction मानिकगड सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक गडचांदुर (राजु भाऊ पारखी)  या संघांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी  विजयी संघांना पारितोषिक  वितरण करण्यात आले 
पहीले बक्षीस हे अल्ट्राटेक सिमेंट आवरपुर(प्रकाश कुमरे)यांना तर 

दुसरी बक्षिस हे मानिकगड सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक गडचांदुर ( प्रविण भक्तुभाऊ सातपाडे ) यांना
 तिसरे बक्षीस SKS construction मानिकगड सिमेंट वर्क्स अल्ट्राटेक गडचांदुर (राजु भाऊ पारखी) यांना प्राप्त झाले व यांनी**मा.श्री रविराज ईळवे कल्याण आयुक्त मध्यवर्ती कार्यालय मुंबई महाराष्ट्र राज्यमा.श्री नंदलाल राठोड सहा. कल्याण आयुक्त विभागीय कार्यालय नागपूर सतिश बिडकर प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष,  प्रशांत देशपांडे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बल्लारपूर  व सचिन भाऊ बोडाले यांनी विजय टीम चे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)