Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात प्रितमजी मडावी याची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड


नागपूर:- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणाऱ्या पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष निकम व राष्ट्रीय महा सचिव श्री. रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले MY KHABAR24 चे मुख्य संपादक तथा REBOOST MY KHABAR24 PVT. LTD. कंपनी चे  FOUNDER & CEO  प्रितमजी मडावी यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

🌄
यांची संकल्पना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरिता आपल्या कंपनीच्या माध्यमातून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म  उपलब्ध करून देत आहेत. यांच्या या कार्याची दखल घेत येत्या २६ मार्च ला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोषजी निकम यांच्या हस्ते नागपूर येथे  डिजिटल मीडियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत