चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन आंबेधानोरा येथे संपन्न

Bhairav Diwase
0


पोंभुर्णा:- दि. २८ फेब्रुवारी रोज मंगळवारला आंबे धानोरा या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य राजीव वेगनवार सर चिंतामणी सांयंन्स काॕलेज पोंभुर्णा हे  होते .त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सेवेचे व्रत अंगीकारले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. नक्षीने यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना आपले व्यक्तिमत्त्व विकास घडविता येते .राष्ट्रीय सेवा योजना ही आपल्याला व्यक्तिमत्व विकास घडविण्याची संधी उपलब्ध करून देते .त्या संधीचा आपण सोन करावा असा सल्ला दिला. उपसरपंच हनमलवार यांनी आंबे धानोरा हे गाव पोंभुर्णा  तालुक्याच्या नकाशामध्ये अग्रेसर आहे. ते जिल्ह्याच्या नकाशात अग्रेसर व्हावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यासाठी आपण सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्याध्यापक आलम सर यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे राष्ट्रीय  कार्य आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले त्यांच्या कार्याचा प्रसार म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य होय असे मत मांडले.कार्यक्रमाचे  अध्यक्ष प्राचार्य डॉ.पठाण सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घेतलेले धडे किंवा सेवेचे व्रत आपण ज्या समाजात जिथे कुठे राहाल तिथे सुद्धा हे जनसेवेचे कार्य सतत कार्यरत रहा तुम्ही असे कार्य करा की हे गाव सुद्धा तुमचे कार्य नेहमीसाठी स्मरणात ठेवेल या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विरुटकर यांनी केले .त्यांनी आपल्या प्रास्तविकातून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि या कार्याचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमाचे संचालन आचल केमेकर या विद्यार्थिनीने केले .स्वागत गीत प्रियंका खोब्रागडे आणि तिचा समूह यांनी सादर केले .आणि आभार सुषमा मळपती या विद्यार्थ्यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी   प्राध्यापक वृंद , शिक्षकेत्तर  कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)