Top News

इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे जन औषधी दिन चंद्रपूर येथे उत्साहात साजरा #chandrapur



चंद्रपूर:- भारत सरकार यांच्या विद्यमानाने भारतातील विविध शहरात जन औषधी केंद्र सुरू आहे. अन्न वस्त्र व निवारा या जीवनावश्यक गोष्टी सोबत औषधी ही देखील जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. या महागाईच्या दिवसांमध्ये औषधांची किंमत देखील प्रचंड वाढलेल्या आहेत.

सर्वसामान्यांना परवडणे शक्य व्हावे म्हणून केंद्र शासनाने जन औषधी परियोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जन औषधी मेडिकल स्टोअर्स मध्ये उत्तम दर्जाची औषधे स्वस्त किमतीमध्ये मिळतात याचाच पाठपुरावा म्हणून जन औषधी दिवसाचा अवचित्त साधून जनजागृती करणाऱ्याच्या दृष्टीने इंडियन मेडिकल रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर तर्फे निशुल्क रक्तदान मधुमेह तसेच आरोग्य तपासणीचे आयोजन दिनांक 01.03.2023 ला रेड क्रॉस भवन चंद्रपूर येथे करण्यात आले. या आरोग्य तपासणीचे आयोजन जिल्हाधिकारी माननीय विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात सचिव डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

या आरोग्य शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे माजी सचिव डॉ. बी एच दाबेरे, सहसचिव डॉक्टर संजय घाटे, कोषाध्यक्ष श्री शादाब चिनी, प्रामुख्याने उपस्थित होते. या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी फार्मासिस्ट श्री विकास गेडाम फार्मासिस्ट पूर्वश दंडमवार, प्रभाकर माणूसमारे, सुभाष मुरस्कर,आरिफ काझी यांनी अथक परिश्रम घेतले.
      

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने