चिंतामणी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी #chandrapur #pombhurnaपोंभुर्णा:- रद्द केलेली १२/२४ वर्षाची आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करा . ७ व्या वेतन आयोग तात्काळ लागू करा, जुनी पेन्शन योजना लागू करा या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सेवक कृती समितीने दिनांक २० फेब्रुवारी पासून बेमुदत कामकाज बंद संप पुकारले आहे.

या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील अनुदानित संपुर्ण महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे. संपात चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स व चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा या संपूर्ण महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.


प्रसिद्धी प्रमुख:-;अतुल अल्याडवार, हर्षद गंदेवार, निखिल राचलवार प्रसिद्धी प्रमुख चिंतामणी शिक्षकेतर कर्मचारी संघटना पोंभूर्णा. जि . चंद्रपूर..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत