Top News

राष्ट्रीय बालपरिषदेत मूर्ती येथील अस्मिता डाखरे हिने केले चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व #chandrapur #Rajuraराजुरा:- सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, शिक्षण विभाग व अंबुजा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित तृतीय राष्ट्रीय बालपरिषद २०२३ मध्ये जि. प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती , केंद्र नलफडी, पं. स. राजुरा येथील उपक्रमशील शिक्षक मनीष अशोकराव मंगरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता शिवाजी डाखरे, वर्ग ७ वा या विद्यार्थीनीने नवी दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय सल्लागार श्रीमती पुजा गुप्ता यांच्या सोबत कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच संवाद साधून तृतीय राष्ट्रीय ऑनलाईन बालपरिषदेचा श्रीगणेशा केला.बालपरिषद म्हणजे विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ. त्यात अस्मिताने सर्वप्रथम सादर केलेल्या तंबाखू विरोधी जनजागृती कार्याचे राष्ट्रीय सल्लागार पूजा गुप्ता यांनी खूप कौतुक व हार्दिक अभिनंदन केले आणि त्यानंतर अस्मिताने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर व सकारात्मक उत्तर त्यांनी दिले. या तृतीय राष्ट्रीय बालपरिषदेचे उद्घाटन डॉ.स्वप्नील लाळे, आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी केले. तर या राष्ट्रीय बालपरिषदेला पॅनेलिस्ट्स म्हणून श्रीमती पुजा गुप्ता, राष्ट्रीय सल्लागार, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, नवी दिल्ली, शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, दीपक चवणे, शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य, डॉ संजयकुमार जाधव, सहाय्यक संचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, श्रीमती श्रीदेवी देशपांडे, राज्य सल्लागार, आरोग्य विभाग, कर्नाटक राज्य , डॉ. अर्चना ओझा, राज्य नोडल अधिकारी, आरोग्य विभाग, उत्तराखंड राज्य हे उपस्थित होते. राष्ट्रीय बालपरिषदेतील आत्मविश्वासपूर्ण सक्रिय सहभागाबद्दल तसेच मूर्ती शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावल्याबद्दल अस्मिता शिवाजी डाखरे व मनीष मंगरूळकर सर यांचे अभिनंदन करून हेमंत भिंगारदेवे, संवर्ग विकास अधिकारी राजुरा, मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी राजुरा, संजय हेडाऊ, विस्तार अधिकारी (शिक्षण) बीट चुनाळा, केवलदास तोडे केंद्रप्रमुख केंद्र नलफडी, धनराज रामटेके सरपंच मूर्ती, मिथुन मंदे , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, महेश शेंडे मुख्याध्यापक यांनी कौतुक केले आहे. या तिसऱ्या राष्ट्रीय बालपरिषदेसाठी अस्मिता शिवाजी डाखरे, हिच्यासह मूर्ती शाळेतील पूर्वा वर्ग आठवीच्या शालिक लांडे, संजीवनी ईश्वर पिपरे, , कु. समिक्षा हरीचंद्र बोढे, , ऋत्विज विनोद वडस्कर , वर्ग सहावा असे एकूण पाच विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक मनीष मंगरूळकर यांनी मागील तीन महिन्यांपासून बालपरिषदेचे संपूर्ण ११ ऑनलाईन प्रशिक्षण सत्र पूर्ण केले. शाळा स्तरावरील उपक्रमानंतर सामुदायिक स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना गावांतील पानठेला, किराणा दुकान, चौकाचौकात अतिशय प्रभावीपणे तंबाखू विरोधी जनजागृती केली. त्यामुळेच कु.अस्मिता शिवाजी डाखरे हिची निवड राष्ट्रीय बालपरिषदेसाठी करण्यात आली. बालपरिषदेत निवड झालेल्या महाराष्ट्र , उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या सहा राज्यांच्या सर्व यंग लिडर्स विद्यार्थ्यांनी उपस्थित संबंधित विविध विभागाच्या केंद्रीय व राज्य स्तरीय वरिष्ठ अधिकारी वर्गासमोर, केलेल्या कार्याची माहिती सांगून प्रश्नोत्तर रूपात प्रभावीपणे संवाद साधला आणि ही तृतीय राष्ट्रीय बालपरिषद २०२३ यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला, त्याबद्दल या विद्यार्थी यंग लिडर्सचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापूर्वी, कोरोना कालावधीत सन २०२०-२०२१ मध्ये मूर्ती येथील इयत्ता आठवीतील प्रियानी प्रवेश जुलमे या विद्यार्थीनीने मनीष मंगरूळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या राज्यस्तरीय ऑनलाईन बालपरिषदेत उत्कृष्टरित्या सहभाग घेऊन शिक्षण संचालक  दिनकर टेमकर यांच्या सोबत आर्थिक अनुदानाबद्दल प्रश्नोत्तराच्या रूपात अत्यंत प्रभावीपणे संवाद साधला होता हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने