राजुरा:- डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील निशस्त्र पोलिस निरीक्षक, निशस्त्र सहायक पोलिस निरीक्षक, निशस्त्र पोलिस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्या असतानाच बुधवारी रात्री पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेसी यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहे.
यामध्ये १९ पोलिस निरीक्षक, ११ सहायक पोलिस निरीक्षक, चार पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या कसुरीवरून, नऊ अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तर २३ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून बदली केली आहेत.
शहर पोलिस स्टेशनचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांची विरुर स्टेशनला बदली झाली आहे. राजुरा तालुक्यातील येणाऱ्या विरुर स्टेशनला जयप्रकाश निर्मल ठाणेदार म्हणून काम बघणार आहे.