अभाविप चंद्रपूर व्दारे मिशन साहसी अंतर्गत विद्यार्थीनींना स्वरक्षणाचे धडे #chandrapur #Abvpchandrapur #ABVP

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर व्दारे शासकीय आदिवासी विद्यार्थिनी वसतिगृह (चंद्रपूर) येथील विद्यार्थिनींना आभविपच्या मिशन साहसी आयामा अंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मिशन साहसी आयाम हे संपूर्ण देशभरात राबविल्या जाते आणि आतापर्यंत संपूर्ण देशात ५२ लाख विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे दिल्या गेले आहेत. विद्यार्थींनीना वेळप्रसंगी स्वरक्षण करता यावे व महीला सशक्तीकरण हा या आयामाचा उद्देश आहे. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थिनींनी "हम फुल भी है, चिंगारी भी है, हम भारत की नारी है" असे उत्साहात घोषणा दिल्या.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम क्षेत्रीय सह संघटन मंत्री राय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम, या कार्यक्रमाच्या प्रशिक्षक रितू पानघाटे, माधुरी खरवडे, अंजली मोहंती, वसतिगृह अधीक्षक शुभांगी हमंद आणि एस. एम. मडावी, चंद्रपूर विभाग संयोजक वैदेही मुडपल्लीवार, जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, जिल्हा सहसंयोजक जयेश भडगरे, पियूष बनकर, सृष्टी डवरे, भुषण डफ, अमोल मदने, चंद्रपूर नगर विस्तारक ऋतिक कनोजीया यांच्यासह बहुसंख्येने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)