Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान देशात सर्वोत्तम #chandrapur


वन संशोधन संस्था डेहराडून, उत्तराखंडची स्पष्टोक्ती

वनमंत्र्यांना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे पत्र


चंद्रपूर:- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वास्तुशास्त्रानुसार भव्य स्वरूप देण्यासाठी आणि उर्वरित संकुल सर्व दृष्टीने सुरक्षित आणि यात्रेकरूंसाठी सोयीचे व्हावे यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. मंदिर एक हजार वर्षे उभे राहावे या विचाराने मंदिर उभारणीची सर्व कामे केली जात आहेत.मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी वन संशोधन संस्था, डेहराडून, उत्तराखंड यांच्याकडून मंदिराच्या दरवाजासाठी सर्वोत्तम लाकडाची माहिती घेतली. संस्थेने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड हे भारतातील सर्वोत्तम दर्जाचे लाकूड म्हणून वर्णन केले आहे.

लार्सन टुब्रो, बल्लारशाह डेपो, टीसीई मध्ये ठेवलेल्या लाकडापासून मंदिराच्या बांधकामात गुंतलेली संस्था. आणि ट्रस्टच्या अभियंत्यांनी ते पाहिले आणि सर्वांचे समाधान झाले.त्यामुळे राममंदिराच्या बांधकामासाठी लागणारे गोलाकार लाकूड आणि चिरण प्रकाष्ठाचा पुरवठा महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडून करण्यात येणार असून, या दर्जाचे लाकूड उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून राममंदिराच्या भव्य दरवाजावरील लाकडी दरवाजांवर कोरीव काम व खोदकाम करता येईल. मंजुरी दिल्याबद्दल आम्ही तुमचे आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मनःपूर्वक आभारी आहो. अश्या आशयाचे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्राप्त झाले झाल्याने परत एकदा चंद्रपूरची मान उंचावली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देशाच्या राजधानीत नवीन संसद भवनातही चंद्रपूरच्या सागवानचा वापर करण्यात आला. ना. मुनगंटीवार यांना आलेले हे पत्र आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

तुमच्या हस्ते पाठवा सागवानाच्या लाकडाची पहिली खेप

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 क्यूबिक मीटर सागवान लाकूड लागणार आहे. त्याची पहिली खेप 29 मार्चला रवाना होणार आहे. या पाठवल्या जाणार्‍या सागवानाच्या लाकडाची पहिली खेप तुमच्या कर कमलांनी पाठवावी. अशी विनंती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चपंत राय यांनी त्या पत्रात केल्याने रामभक्तांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

मंगळवारी बल्लारपूर डेपोत येणार ते सागवान

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे दरवाजे बांधण्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील "सागवान लाकूड" उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे लाकडं मंगळवारी 28 मार्चला बल्लारपूर येथील वनविकास महामंडळा (एफडीसीएम)च्या डेपोत पोहोचणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने