अज्ञात अल्पवयीन दुचाकीस्वाराच्या धडकेत महिला गंभीर जखमी #chandrapur #Korpana #Gadchandur #accident

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील बस सथानक चौकात दिनांक 25/2/2023 रोजी श्रीमती अनुसया उमाजी वाटोरे वय वर्ष 65 ही महिला जिवती तालुक्यातील मूकदम गुडा येथून गडचांदुर येथे आपल्या मूलीला भेटण्याकरीता येत असतांना बस सथानक चौकात एका अज्ञात अल्पवयीन बाईक स्वाराने महिलेला जबर धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली असून आरोपी कारवाईच्या भीतीने स्वता ऑटोमधे टाकून सरकारी दवाखान्यात नेला व तेथून पसार झाला.

फरार आरोपीचा व्हिडियो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला परंतु, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हिडियो अस्पष्ट दिसत असल्याने त्या आरोपी इसमाचा शोध पोलीसांना लावता आला नाही. आरोपी कॅमेरा मध्ये कैद झाला असूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने हे कॅमेरे कोणत्या कामाचे? असा गंभीर प्रश्न नागरीकापूढे निर्माण झाला आहे.

सरकारी दवाखान्यातील हे लोकल कॅमेरे तात्काळ बदलवून चांगले उच्च दर्जाचे कॅमेरे लावण्यात यावे व भविष्यात होणारी दुर्घटना टाळावे व महिलेला गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी व पिडीत महिलेला योग्य न्याय मिळवून द्यावे हीच मागणी पिडीत महिलेच्या कूटूंबधारकाकडून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.