चंद्रपूर जिल्ह्यात सिनेमागृह जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान #chandrapur #bramhapuri #Fire #firenews #Adharnewsnetworkब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव सिनेमागृह शहरातील आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही.

सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला. संपूर्ण खुच्या, मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत