वैनगंगा नदीपात्रातून डोंग्याने धोकादायक जलप्रवास #chandrapur #chandrapur pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील जुनगावनजीक बोरी वैनगंगा नदी घाट असून, सदर नदीघाटानंतर गडचिरोली जिल्ह्याचा प्रारंभ होतो, जुनगाववरून शॉर्ट कट मार्गाने गडचिरोलीला जातो म्हटले तर, वैनगंगा नदी आड येऊन सर्वसामान्य जनतेला सदर मार्गाने जाणे कठीण काम असते. तरीही नागरिक गडचिरोली जिल्ह्यातील बोरी भीक्षी गावाला नदीतून डॉय्याने जीव मुठीत घेऊन जातात. हा जलप्रवास धोक्याचा ठरू शकतो.

वैनगंगा नदीच्या अलिकडे जुनगाव तर पलिकडे गडचिरोली जिल्ह्यातील बोरी हे गाव आहे. नदी पार करून बोरी गावावरून सहज गडचिरोलीला जाता येते. त्यामुळे या परिसरातील नागरिक डोंग्याने नदीतून प्रवास करतात. काही वर्षांपूर्वी शासनाने वैनगंगा नदीवर पूल बांधकामाला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती; परंतु आतापर्यंत सदर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही.

विशेष म्हणजे, पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव गावातील भाजीपाला विक्रेते याच मार्गाचा वापर करून भाजीपाला चामोर्शी, गडचिरोलीपर्यंत पोहचवून विक्री करीत असतात.

#theft #warora #chandrapur #gadchiroli #Maharashtra #India #Adharnewsnetwork #bhairavdiwase #police #yawatmal #nagpur #arrested #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #accident