नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आमदारांचा गाव मुक्काम #chandrapur #chimurचंद्रपूर:- नागरिकांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी कीर्तीकुमार भांगडिया यांनी गाव मुक्कामाला सुरूवात केली आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात “आमदार आपल्या गावात” उपक्रमाच्या शुभारंभ केला आहे. शनिवारी पहिल्याच रात्री चिमूर तालुक्यातील सातारा गावात आमदारांनी मुक्काम करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी सातारा, टेकेदार, बाम्हणगाव, मासळ गावातील नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. त्या समस्या ऐकूण आमदारांनी लगेच संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरून चर्चा केली. आणि समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. चिमूर येथील आमदार महोदयाच्या उपक्रमाची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.

#Amdar #MLAbantybangdiya #MLABuntyBhangdiya #Adharnewsnetwork #bhairavdiwase #chimur #chimurmla #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #digitalmarketing #Mobile #technology #india #marketing # Google #Googlemeet #Googlepay #Phonepay #filpkart #Amazon 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या